खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सावखेड भोईत विहिरीच्या वादातून मारहाणीचा आरोप; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : तालुक्यातील सावखेड भोई येथे शेतजमीन आणि विहिरीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादातून मारहाण झाल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात महिलेचा विनयभंग, तिच्या पतीला विळ्याने जखमी करणे, नातेवाइकांना मारहाण करणे तसेच पाळीव कुत्रा अंगावर सोडल्याचे आरोप करण्यात आले असून, तक्रारीच्या आधारे नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.

फिर्यादी अरुणा कारभारी डोणे (वय ४१, रा. सावखेड भोई) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा आणि संबंधित आरोपींचा शेतजमीन व विहिरीवरून न्यायालयीन वाद सुरू आहे. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान शेतशिवारात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटार टाकल्याच्या संशयावरून फिर्यादीचे पती फोनवरून चौकशी करीत होते. त्यावेळी काही जणांनी घटनास्थळी येऊन त्यांच्याशी वाद घातला, शिवीगाळ व मारहाण केली तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर संबंधित नऊ जणांनी कथितरीत्या विळा, चाकू आणि काठ्या घेऊन फिर्यादीच्या घरी येत शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वेळी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांना दुखापत झाल्याचा आरोप आहे.

फिर्यादीने केलेल्या आरोपानुसार, तीन आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच एका आरोपीने तिच्या पतीच्या डोक्यात विळ्याने वार केल्याचा, तर अन्य एका आरोपीने तिच्या दिराचा हात पिळून दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. इतरांनी काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. याशिवाय, पाळीव कुत्रा अंगावर सोडण्यात आल्याने कुत्र्याने चावा घेतल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी काशिनाथ रघुनाथ डोणे, सोमिनाथ रघुनाथ डोणे, शिवानी रघुनाथ डोणे, मीना रघुनाथ डोणे, रघुनाथ तुकाराम डोणे, रुखमिनी तुकाराम डोणे, सत्याभामा तुकाराम डोणे, मुरलीधर अहिंदे (रा. दरेगाव, जि. जालना) आणि शिवाजी हंडे (रा. सावखेड भोई) यांच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे तक्रारीतील तपशीलात नमूद आहे.

१४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३७ वाजता तक्रार दाखल झाल्याचे नमूद असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काकड यांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button