क्रिडामहाराष्ट्रविदर्भ

श्री व्यंकटेश महाविद्यालयाची मैथिली तायडे वुशू क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा ; स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची ११ वी कला शाखेत शिकणारी विद्यार्थिनी मैथिली विजयकुमार तायडे हिने नुकत्याच अमरावती येथे झालेल्या विभागीय वुशू क्रीडा स्पर्धेत अजिंक्यपद पटकावून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

सत्र २०२६-२७ या वर्षामध्ये आंतर शालेय विभागीय वुशू क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती येथे शुक्रवार, दिनांक १८ सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या. या विभागीय स्पर्धेमध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या ५ जिल्ह्यातील बहुसंख्य शाळेच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

मैथिलीने या स्पर्धेमध्ये १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या ४८ किलो वजन गटातून स्पर्धा खेळत अजिंक्यपद प्राप्त केले. तिने या कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. यावर्षी राज्यस्तरिय स्पर्धा दिनांक २३ व २४ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे होत आहेत. या स्पर्धेत मैथिली अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे याच शैक्षणिक सत्रामध्ये मैथिलीने १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या तायक्वांदो स्पर्धेमध्ये ४९ किलो वजन गटातून विभागस्तरिय स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले.

मैथिलीच्या दुहेरी यशाबद्दल श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व तिला नंदूरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button