Uncategorized

वाशिम जिल्हा बालविवाह मुक्त करणार

“सर्वांनी सहकार्य करावे युवा रुरल असोसिएशनचे जिल्हा वाशियांना आवाहन”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम ; – भारतातील बालकांच्या हक्कासाठी अॅक्सेस टू जस्टीस ही मोहीम देश पातळीवर राबविला जात आहे. भारतामध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. प्रत्येक चार मुली मागे एका मुलीचा अठरा वर्षाचा आत विवाह होऊन त्यांच्यावर मातृत्व लादले आहे. मुल हरवणे, बालकांची अपव्यापारासाठी तस्करी होणे, बालकांचा कामगार म्हणून भिक्षेकरी म्हणून अप व्यापार होण्याचे प्रमाण गंभीर व चिंताजनक आहे.

बालविवाह मुक्त भारत बाल तस्करी, बालमजुरी प्रतिबंध, बाल लैंगिक शोषण प्रतिबंध या विषयावर या प्रकल्पात बालकांच्या हक्कासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यू एस यांच्या सहकार्याने भारतामध्ये तसेच वाशिम जिल्हा प्रशासन यांच्या सहयोगाने युवा रुलर असोसिएशन या संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे.
बालकांच्या हक्कासाठी व बाल अत्याचार प्रतिबंध तसेच बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत आकस्मिक असलेला वाशिम जिल्हा हा देखील आता बालविवाह मुक्त करणासाठी ५० गावांमध्ये जाणीव जागृती, कार्यक्रम बालविवाह रोखणे, बाल बाल तस्करी थांबविणे वाशिम जिल्हा माननीय जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक, बालकल्याण समिती, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, जिल्हा कामगार अधिकारी, रेल्वे पोलिस, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका प्रशासन, पोलिस प्रशासन इत्यादी विविध संबंधित घटकांबरोबर बालकांना न्याय देण्यासाठी कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक अशा उपक्रमात सर्व समाज घटकांनी आणि संवेदनशील नागरिकांनी एक्सेस टू जस्टीस प्रकल्प वाशिम जिल्ह्यात यशस्वी पूर्ण रीतीने राबविण्यात सहकार्य करावे असे आवाहन युवा रुरल असोसिएशन जिल्हा समन्वयक श्री.दिवाकर देशमुख, तालुका समन्वयक प्रदीप पट्टेबहादुर, विनोद अंभोरे,राणी भगत यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button