वनपरिक्षेत्र विभाग अघई यांच्या माध्यमातून वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

सचिन शेलवले – अघई विभाग
ग्रामपंचायत टहारपुर हद्दीतील माळरानावर(ससी डोंगरी )वनपरिक्षेत्र विभाग अघई, ग्रामपंचायत टहारपूर व संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर टहारपुर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ,पक्षी ही सुस्वरे आळविती या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे झाडे ही आपले मित्र आहेत . प्रत्येकानी एक तरी झाड लावले पाहिजे व जगवली पाहिजेत .दरवर्षी तापमानात वाढ होत आहे . झाडे कमी होऊ लागली आहेत . ऑक्सीजनचा साठा कमी होऊ लागला आहे . त्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या अवतीभवती झाडे लावली पाहिजेत व त्याचे व्यवस्थित पद्धतीने संगोपन केले पाहिजे ही काळाची गरज आहे ,
वृक्षारोपण करताना वनआधिकारी विजय देसले यांनी सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत यांचे आभार मानले व सर्व विद्यार्थ्यांस पेन व चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच शिक्षक वृंद सुभाष पाटील सर यांनी भविष्यात वृक्षांचे महत्त्व काय याबाबत मार्गदर्शन केले
यावेळी शिक्षक सुभाष पाटील , जगन्नाथ कुवर,सचिन शेलवले, रोहिदास गोदडे, वनपरिक्षेत्र अधिकारी/कर्मचारी ,ग्रामपंचायत टहारपुर कमिटी व ग्रामस्थ उपस्थित होते,



