अकोला

श्री शिवाजी विद्यालय तेल्हारा येथे ३१ वर्षानंतर माजी विद्यार्थी परत आले एकत्र ! शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा स्नेह-मिलन सोहळा थाटात झाला संपन्न.

विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अकोला जिल्हा

तेल्हारा, दि. ६ जुलै : श्री शिवाजी विद्यालय, तेल्हारा येथील इ.स.वी. सन १९९५ मधील इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी तब्बल ३१ वर्षांनंतर परत एकदा शाळेत एकत्र आले. यानिमित्य शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा स्नेह- मिलन सोहळा आयोजित केला होता हा मोठ्या थाटात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद बाळासाहेब मार्के , तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक सुरेशदादा खोटरे , तसेच कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पिवाल सर, उद्धवराव विखे सर, अतुल म्हैसने सर, गजानन भारसाकळे सर, सांगुनवेढे सर, पी. एस. शित्रे सर, सेवकराम कराळे सर, दिवाकर वानखडे सर, डी. एस. शित्रे सर, सुरेश तायडे सर, टाले सर, अन्वर शाह बाबू साहेब, सौ. सावरकर मॅडम, सौ. परणाटे मॅडम, सौ. वानखडे मॅडम, डॉ. गो. खे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले, सुधीर देशमुख, मुख्याध्यापक शांतिकुमार सावरकर, भोवर सर, लोखंडे सर, तेजराव कडू, विजय दहे आणि मुकुंद कडू यांची उपस्थिती लाभली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष आमले यांनी केले, तर प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सदानंद बाणेरकर यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सुधीर ढोले व सौ. वैशाली सित्रे यांनी मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. आभार प्रदर्शन डॉ. सतीश वाकोडे यांनी केले.

या स्नेह- मिलन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी अन्सार पटेल, दीपक फोकमारे, सुरेंद्र भोंगळ, सुनील राठोड, अतुल कोरडे, प्रभाकर डोंगरे, विवेक म्हसाये, शैलेश पाचडे, राजू मोरे, सतीश दुतोंडे, देवानंद फोकमारे, अहमदभाई, माधुरी देशमुख, मंगला अहेरकर, वैशाली माळी यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रमात जुन्या आठवणी, मैत्रीचे ऋणानुबंध आणि गुरुजनांविषयीचा आदर यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button