बुलढाणा

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे हे भाजपा कार्यकर्त्यांचे आदर्श स्थान -आमदार ॲडवोकेट आकाश फुंडकर

स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी भाजपातर्फे अभिवादन!

ओरिसा येथील रेल्वे अपघातातील मृतांना देखील भाजपातर्फे श्रद्धांजली.*
_________स्टार भारत लाईव्ह
एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

  • संघर्ष योद्धा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँडवोकेट आकाशदादा फुंडकर यांचे हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी “अमर रहे अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे, च्या घोषणा देण्यात आल्या. यासोबतच ओरिसामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेल्यांना देखील यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन सद्भावना व्यक्त करण्यात आल्या. संघर्ष योद्धा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी तळागाळातील शेतकरी शेतमजूर व या वर्गासाठी काम केले त्यांचे हितासाठी स्वर्गीय गोपीनाथजींनी समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले शेतकरी शेतमजूर असो वा ऊसतोड कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली.
    स्वर्गीय गोपीनाथजींच्या मार्गावर चालत राज्यातील भाजपा शिवसेनेचे सरकार सध्या कार्य करीत असून जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे या योजनांसह छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली आहे. तसेच राज्यातील भाजपा युती सरकारने काही दिवसापूर्वीच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना 6000 रुपये एवढा निधी दिला जातो त्याचप्रमाणे राज्य सरकार तर्फे देखील 6000 रुपये शेतकरी सन्मान निधी देण्याची घोषणा केली आहे राज्यातील भाजपा युती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत आहे असे यावेळी आमदार एडवोकेट आकाश फुंडकर म्हणाले. यावेळी भाजपा गटनेते राजेंद्र धनोकार युवा मोर्चा अध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थ्या आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, युवराज मोरे, मुजुमिलभाई, पंकज गायगोळ, शुभम देशमुख जोहरी, श्रीकृष्ण ठाकरे, संतोष येवले निकुंज मंदानी, संजय घोगरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button