मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आज छाननीच्या दिवशी 43 अर्जांपैकी 24 उमेदवारी अर्ज वैध

मुक्ताईनगर — मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आज छाननीच्या दिवशी 43 अर्जांपैकी 24 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत तर महायुतीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले योगराज कन्स्ट्रक्शन चे संचालक विनोद नामदेव सोनवणे, बहुजन समाज पार्टी अनिल गंभीर मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनिल बाबुराव गंगतीरे, पीपल पार्टी ऑफ इंडियाचे अशोक बाबुराव जाधव, वंचित बहुजन आघाडी संजय पंडित ब्राह्मणे, यांच्यासह एकूण 24 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
महायुतीचा मतदार संघातील प्रभाव आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांचं प्राबल्य पाहता , खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी एकनाथ खडसे यांना निवडणूक सोपी व्हावी यासाठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचे मनसुबे आखलेले आहेत. त्यातील काही अपक्ष उमेदवार दिलेले आहेत तर चंद्रकांत पाटील यांच्या नावातच संभ्रम निर्माण करण्यासाठी देखील मोठी व्यूहरचना आखलेली होती.त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे दोघांचे उमेदवारी काल दि.२९ रोजी शेवटच्या क्षणी दाखल केलेली होती.
१) चंद्रकांत निंबा पाटील (वडिलांचे नाव निंबा गणा पाटील ) मु. डोंगरगाव पो.वाघाडी बू. ता. शिंदखेडा जि.धुळे
२) चंद्रकांत निंबा पाटील (वडिलांचे नाव निंबा कौतिक पाटील ) मु.पो. खडके खु. ता.एरंडोल जि.जळगाव
अशा दोघांची उमेदवारी दाखल करण्यात आलेली होती परंतु त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांचे नाव समाविष्ट असलेल्या मतदार यादीची प्रमाणित नक्कल वेळेत छाननीच्या वेळेस सादर न केल्याने दोघांचे अर्ज बाद झाले आहेत.



