Uncategorized
राहुरी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार नवले यांची हेकेखोरी,,, चळवळीच्या कार्यकर्त्यांना अरेरावी!!!

सध्या महाराष्ट्रात परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणारी घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या वर्गामध्ये व सर्व बहुजन समाजामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील फुले,शाहू,आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 11/12/2014 रोजी राहुरीचे तहसीलदार व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सदर घटनेबाबत निवेदन तयार करून चळवळीत प्रमुख कार्यकर्ते राहुरी तहसील आवारात जमा झाले. राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी गेले परंतु पोलीस निरीक्षक हे उपस्थित नसल्या कारणामुळे त्यांनी नियमानुसार आपल्या भावना कर्तव्यावर हजर असणारे ठाणे अंमलदार नवले साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त करण्याचे ठरवले चळवळीतील सर्व कार्यकर्ते ठाणे अंमलदार असणारे नवले साहेब यांच्याकडे जाऊन सदर हकीगत सांगितली सदर ठाणे अंमलदारांनी निवेदन वाचून त्या निवेदनावर स्वाक्षरी केली सदर निवेदन आपल्याला देताना आम्हास फोटो हवेत सदर फोटो आम्ही पत्रकारांना देणार आहोत असे सांगितले त्यावर ठाणे अंमलदार नवले यांनी सांगितले की मी निवेदन स्वीकारताना फोटो काढण्यास बाहेर येणार नाही. आणि निवेदन स्वीकारणार नाही. अशी ठाम भूमिका घेतली चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये या नवले ठाणे अंमलदाराविषयी व त्याच्या कृती विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. निवेदन देणारा मध्ये आग्रही असणारे कोळीवाडी गावचे सरपंच व आत्ता झालेल्या विधानसभेचे उमेदवार श्री डॉक्टर जालिंदर घिगे यांनी ठाणे अंमलदार नवले यांना स्पष्ट शब्दात विचारले की आम्हा दलित,बहुजन, आदिवासी लोकांच्या हाताने निवेदन स्वीकारताना तुम्हाला बाट लागतो काय? अशा खड्या प्रश्नात विचारणा केली विद्रोही चे कार्यकर्ते श्री संदीप कोकाटे यांनी नवले साहेब यांना आपण जनतेचे नोकर आहात आणि आम्ही तुमचे मालक आहोत ही जाणीव ठेवा या शब्दात सुनावले चळवळीचे महिला कार्यकर्ता यमुनाबाई भालेराव यांनी साहेब आपण ज्या खुर्चीवर बसला आहात ती खुर्ची आपणास संविधानाने दिले आहे याचं भान ठेवा. आणि त्याच संविधानाचे निवेदन घेण्यासाठी तुम्ही नकार देताय जर तुम्ही आमचे निवेदन जाहीर रित्या स्वीकारले नाही तर आम्ही चळवळीचे सर्व कार्यकर्ते आपल्या विरोधात मोर्चा काढून आपले गैरवर्तनासंदर्भात व कायदेशीर काम न करण्याच्या संदर्भात आपली लिखित तक्रार आपल्या वरिष्ठाकडे करू अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव गोळा झाला. अनेक कार्यकर्ते राहुरी पोलीस स्टेशनला दाखल होऊ लागले. या जमावा मध्ये असणाऱ्या चंद्रकांत जगधने या पत्रकारांनी देखील ठाणे अंमलदार नवले साहेब यांना साहेब आम्हा पत्रकारांना निवेदन स्वीकारताना का फोटो देऊ शकत नाही याचे कारण मला सांगा. अशाप्रकारे जमलेल्या जमावा पैकी बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी ठाणे अंमलदार नवले साहेब यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आजूबाजूला अनेक पोलीस कर्मचारी जमा होऊ लागले. परिसरात बग्याची गर्दी वाढत गेली, परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे लक्षात येताच ठाणे अंमलदार नवले साहेब यांनी निवेदन घेण्यास होकार दिला. आणि निवेदन सर्वांसमोर स्वीकारले. या निवेदनावर कोळेवाडी गावचे सरपंच डॉक्टर जालिंदर घिगे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव संदीप कोकाटे, सामाजिक कार्यकर्त्या यमुनाबाई भालेराव, पठाण अमजद भाई, आदित्य साळवे, इमरान शेख, परवेज बागवान, रईस पठाण, अनिल विधाटे, अमोल गायकवाड, पंकज पवार, भारत जगधने, मन्सूर पठाण, अजीम इनामदार,विकी बोर्डे आदींच्या सह्या होत्या. यानंतर या प्रकरणावर चळवळीचे कार्यकर्ते आता काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षक हे पोलीस स्टेशनला हजर नसताना हे पोलीस कर्मचारी व ठाणे-अंमलदार हे नेहमी अशाच चुकीच्या भूमिका स्वीकारतात असा अनुभव सर्वसामान्य जनतेला नेहमीच येत असतो. सदर ठाणे अंमलदार नवले साहेब यांच्यावर कर्तव्यदक्ष असणारे पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागून आहे. असे हेकेखोर, अधिकाराचा गैरवापर करणारे व सर्वसामान्य जनतेला विठीस धरणारे अधिकारी हे प्रत्येक ठिकाणी असतात त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करेल याबाबत जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे.



