राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज महाप्रबोधन यात्रा कार्यक्रम

*राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज महाप्रबोधन यात्रा कार्यक्रम उत्साहात*जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सन २०२२-२३ या वर्षात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सैनिक सेलच्या वतीने दि.१० फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२३ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकजागर अभियान राबविण्यात येत आहे. या लोकजागर अभियान यात्रेचे 17 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यात आगमन झाले . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी सैनिक सेलचे प्रदेश अध्यक्ष दिपकजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात लोकजागर सभेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात माजी सैनिक सेल सभासद नोंदणी अभियान राबविणे व माजी सैनिकांच्या समस्या समजुन घेत त्यावर उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले . तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ करून सत्कार देखील करण्यात आला . त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेश सचिव बाबासाहेब जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुंबई उच्च न्यायालयाचे सिनियर मेडीएटर ऍड. संभाजीराव मोहिते यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जीवनातील विविध दुर्मिळ घटनांचे दाखले देत त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकुन शाहू महाराजांची महती विषद करून प्रबोधन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र नव्या पीढी पर्यंत पोहोचविणे आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. या महत्त्वाच्या सांस्कृतिक उपक्रमासाठी सर्वांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहन यावेळी ऍड. मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन सामाजिक न्याय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी केले . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब पाटील , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी , राष्ट्रवादी महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई चौधरी , महानगर राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी , महानगर शहर संघटक राजु मोरे , महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपुत , महानगर जिल्हा उपाध्यक्ष सौ. जयश्रीताई पाटील , महानगर सरचिटणीस रहिम तडवी , विशाल देशमुख , समाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष रमेश बहारे , अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस सलिम ईनामदार , महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे, महानगर युवक सरचिटणीस हितेश जावळे , युवक उपाध्यक्ष सहिल पटेल , रफिक पटेल , महानगर कार्यालय मंत्री राहुल टोके , सह कार्यालय मंत्री राजु बाविस्कर, जिल्हा कार्यालय मंत्री सतिश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते*



