बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
जनुना येथे जलजीवन अंतर्गत नवीन पाण्याची टाकी, एक नवीन विहीर , जुनी टाकी रिपेअर , नवीन पाईपलाईन ,यासाठी1 कोटी 65 लाख रुपयांचा निधी

( बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रोकडे)
जनुना येथे जलजीवन मिशनअंतर्गत गावामध्ये नवीन पाईपलाईन, व नवीन विहीर, नवीन पाण्याची टाकी याची क्षमता 80 हजार लिटरआहे. . त्यामध्ये गावातील नवीन पाईपलाईन चे काम पूर्ण झालेले आहे. तसेच जुनी पाण्याची टाकी त्याचे सुद्धा रिपेअर यास निधीमधून होणार आहे . त्याचे काम अजून पेंडिंग आहे. जनुना गावासाठी1 कोटी 65 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे व त्यातून 90% कामे झालेले आहेत यामुळे गावातील नागरिकांना दररोज 55 लिटर पाणी मिळणार आहे . त्यामुळे गावाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे….



