ग्रामीण भागात गृहिणींना सिलिंडर परवडेनाः

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी मिलिंद चराटे
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गोरगरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. परंतु पैशाअभावी शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा गॅस सिलिंडर खरेदी करता आला नाही. त्यामुळे त्यांच्या घराच्या कोपऱ्यात रिकामे गॅस सिलिंडर पाहावयास मिळत आहेत.सध्या लाकूड, इंधन काडी आणि गोवऱ्यांवरच स्वयंपाक करावा लागत आहे. ग्रामीण भाग धूरमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यास सुरुवात केली. गरीब महिलांना गॅस सिलिंडर मिळत होते.मात्र, वाढलेले सिलिंडरचे दर अकराशे पन्नास रुपये झाले. पैशाचा •अभाव यामुळे ग्रामीण भागात रिकामागॅस सिलिंडर आता घराच्या कोपन्यात पाहावयास मिळत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर मिळाला. सुरुवातीला गॅस भरला.आता पुन्हा किमती वाढल्याने गॅस भरता येत नाही. महिलांना स्वयंपाकासाठी पुन्हा चुलीवर धुराचा सामना करावा लागत आहे.



