4 वेळा मोजणीची नोटीस घेऊनही शेतकऱ्याच्या शेताच्या मोजणीस टाळाटाळ करत असल्याने भूमी अभिलेख कार्यालय नांदुरा येथे योगिता गावंडे यांनी दिला ठिया…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)
धानोरा येथील श्रीकांत दयाराम नरवाडे या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मोजणीसाठी दुसऱ्यांदा मोजणी फी भरूनही त्यांच्या शेताची मोजणी होत नसल्याने व हेतू पुरस्कार मोजणी पुणे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने आज दिनांक 16 मे रोजी नांदुरा पंचायत समितीच्या उपसभापती योगिता गावंडे आणि पत्रकार संदीप गावंडे यांनी शेतकरी यांचे सह भूमी अभिलेख कार्यालय नांदुरा येथे भेट दिली असता उपअधीक्षक हेमंत किन्हीकर गैरहजर होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीची मोजणी चे काम मार्गी लागावे याकरिता भूमी अभिलेख कार्यालय नांदुऱ्याची उपअधीक्षक हेमंत किनीकर यांच्या कार्यालयासमोर ठिया दिली आहे . शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे याने दुसऱ्यांदा मोजणी फी भरल्यानंतर त्यांना आतापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडून तब्बल चार वेळा मोजणी नोटीस मिळाले आहे त्यांपैकी शेवटच्या नोटीस वर आज 16 मे 2024 रोजी त्यांची मोजणी असल्याचे त्यांना कळविण्यात आले होती परंतु शेतात वाट पाहूनही मोजणी अधिकाऱ्याचा पत्ता नसल्याचे त्यांनी मोजणी अधिकारी यांना फोन केला असता आज माझी मिटींग आहे असे कारण त्यांना सांगण्यात आले. आतापर्यंत तब्बल चार वेळा मोजणी नोटीस येऊनही सदर शेतकऱ्याची शेताची मोजणी झाली नाही. शिवाय प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचे स्वतः मोजणी अधिकाऱ्यास फोन केलेले आहे मोजणी अधिकारी यांनी एकदाही शेतकऱ्यास मोजणी जमत नाही तेथे थांबू नका असा साधा निरोप कधीच दिला नाही त्यामुळे मोजणीच्या प्रत्येक तारखेस शेतकरी पुरते हैराण झालेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ मोजणीच्या आशेवर ठेवण्यात भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक हेमंत किनीकर यांना खुलासा विचारण्यासाठी उपसभापती योगिता गावंडे यांनी सकाळी 11 वाजता नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालय गाठले असता तेथे उपअधीक्षक हेमंत किनीकर गैरहजर आढळून आले. तसेच त्यांच्या कार्यालयात कुलूप आढळून आले. त्यामुळे कार्यालय अधीक्षक शेकडे यांना विचारणा केली असता किनीकर साहेब कधी येतील हे माहित नाही असे उत्तर मिळाले. जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात मोजणीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपअधीक्षक हेमंत किनीकर यांच्या कार्यालयासमोर उपसभापती योगिता गावंडे, पत्रकार संदीप गावंडे आणि शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे यांनी ठिया दिली अशाप्रकारे तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे मोजणीचे प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती कार्यालयात उपस्थित इतर शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकऱ्यांचे शेत मोजणीचे प्रश्न भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ मार्गी लावावे अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपसभापती योगिता गावंडे यांनी दिला आहे. ✍



