आसलगाव नदीवरील पुलाचे काम अर्धवट!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे( जळगाव जामोद)
जळगाव जामोद: आसलगाव याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव ते नांदुरा हा अतिशय वरदडी चा रस्ता असून या पुलाचे काम या अगोदरही रेंगाळले होते. त्यामुळे पावसातही वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला यातच आता नदीपात्र पुरी बांधकाम पाणी अडवण्याकरता नदीपात्र मातीचा ढीग लावून पाणी अडवले होते पण अजून सुद्धा पावसाळा तोंडावर आल्यावरही मातीचा ढिगारा नदीपात्रात त्याच अवस्थेत पडला आहे. जर पाऊस पडला आणि नदीला पूर आला तर पाणी अडवून संपूर्ण पाणी हे गावात घुसण्याचे नाकारता येत नाही या अगोदरही सुद्धा 22 जुलैला महाभयंकर अतिवृष्टी मुळे व महापुरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कारण संपूर्ण पुराची पाणी हे गावात घुसल्याने अनेकांची घरे वाहून गेली. त्यातच नदीमध्ये असलेला मातीचा हा ढिगारा अजून सुद्धा घातक ठरू शकतो. व तसेच फुल आणि रस्ता खालीवर असल्याने याचा वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
अतिशय प्रमाणात धूळ व पुलाजवळ खाली असलेला रस्ता यामुळे वाहनधारक तसेच नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहे. तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन हा गंभीर प्रश्न मार्गी लावावा अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे.



