बुलढाणामहाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक,संपादक पत्रकार,शे.का.प. चे नेते स्व.भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तेल्हाऱ्यात विविध ठिकाणी अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी- व्हि.एम.घोडे

तेल्हारा – दि.०४
शे.का.प.चे नेते,जेष्ठ साहित्यिक ,संपादक ,पत्रकार स्व.भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तेल्हारा येथे विविध ठिकाणी त्यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील श्री दत्तात्रय अर्बन मल्टी स्टेट को- आॅप क्रेडिट सोसायटी लि.शाखा तेल्हारा च्या वतीने भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती प्रतिष्ठान येथे अभिवादन करण्यात आले यावेळी शाखा व्यवस्थापक शुक्ला साहेब,माजी मुख्याध्यापक गोपाल भुजबले, संघर्ष सावरकर,प्रशांत उमाळे ,उत्तमराव नळकांडे, लिपीक वाकोडे, येवले सर , विजय घोडे आदी उपस्थित होते.
भाई प्रभाकरराव सावरकर यांचे कर्मस्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दरबार मळी येथे व बेलखेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमलताई सावरकर,माजी उपसरपंच बाळासाहेब सावरकर, संघर्ष सावरकर, निळकंठ घाटोळ सर, राजेश गोमासे सर,म्हसाळ सर, सोयम सर इत्यादी उपस्थित होते तसेच
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक प्रमोद काळमेघ , सहाय्यक शिक्षीका सौ प्रेरणाताई कराळे, शांतीकुमार सावरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फराळ व फळे वाटण्यात आले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
तसेच तेल्हारा येथील डॉ सुप्रित कराळे यांच्या प्रेरणा हॉस्पिटल इमरजन्सी क्लिनिक येथे रुग्णाना फळवाटप करण्यात आले. डॉ सुप्रित कराळे यांच्या हस्ते स्व भाई प्रभाकरराव सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी तेल्हारा तालुका खरेदी विक्री संस्थेचे संचालक अनंत अहेरकर, शिवाजी विद्यालयाचे माजी शिक्षक सुहासराव कराळे,डॉ.अक्षदा पाटील तुरखडे, सौ. प्रियंका प्रयत्न कराळे, तेल्हारा येथील पत्रकार सत्यशिल सावरकर इत्यादी उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button