महाराष्ट्र

“पार्डीतिखे रिठद परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक खोळंबली “

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिसोड तालुक्यातील पारडी तिखे हा रस्ता नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो या रस्त्यावरील शाळेत जाणारे -येणारे विद्यार्थी तथा प्रवासी पार्डी तिखे गावाजवळील नाल्याला मुसळधार पावसामुळे पाणी आले असून शिरपूर ते बेलखेडा रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता बंद होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव यांनी शिरपूर ते मालेगाव रस्त्यावरील नेहमीच पावसाळ्यात पावसामुळे पुलावरून पाणी जाते तेथे पुलाची उंची वाढूऊन नवीन पुल करण्यात यावा. अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. तसेच रिठद गावालगत असलेल्या अडोळ नदीला सुद्धा असंच मुसळधार पावसामुळे प्रथमतः पाणी आले आहे त्यामुळे विहिरी ,बोरवेल इत्यादीची पाण्याची काही प्रमाणात पातळी वाढणार असे परिसरातील शेतकऱ्यांना वाटते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button