मेडशी येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.वास्तुविशारद, कामगार, सुतार, उत्पादन कामगार आणि यांत्रिकी यांच्यासाठी विश्वकर्मा जयंती ही एक महत्त्वाची सुट्टी आहे. या दिवशी हे व्यावसायिक त्यांच्या मशीन, संगणक, वाहने,दुचाकी आणि इतर यंत्रांची पूजा करतात आणि भगवान विश्वकर्माची प्रार्थना करतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेडशी येथील विश्वकर्मा जयंती निमीत्त विश्वकर्मा बांधावा कडून भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमा फोटो चे पूजन करून आरती करत गावातील नागरिक करीता खिचडीचे प्रसादचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमात धीरज विश्वकर्मा,नीरज विश्वकर्मा, राज किशोर विश्वकर्मा, गोरखनाथ भागवत, सुहास पिंपळकर,प्रमोद तायडे,मंनान तायडे, समर्थ विश्वकर्मा,रुद्र विश्वकर्मा,ओम् विश्वकर्मा, अजिंक्य मेडशीकर तसेच कु सिद्धी धीरज विश्वकर्मा हिने रांगोळीतून भगवान विश्वकर्मा यांची अप्रितम अशी प्रतिमा साकारली होती.



