महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट तपासणी ची धाबे शिवारातील शेतगट क्रमांक 173/2 मध्ये अनधिकृत बांधकाम – जमीन मालकांची प्रशासनाकडे तक्रार

मुक्ताईनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट तपासणी ची धाबे शिवारातील शेतगट क्रमांक 173/2 मध्ये अनधिकृत बांधकाम – जमीन मालकांची प्रशासनाकडे तक्रारमुक्ताईनगर, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता. ९ ऑगस्ट – मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे धाबे शिवारात शेत गट क्रमांक 173/2 या जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्रविण अरविंद झनके आणि रविंद्र नामदेव झनके या जमीन मालक बंधूंनी महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट प्रा. लि. कार्यालयाकडे केली आहे.झनके यांच्या म्हणण्यानुसार,आमची शेत जमीन 4 एकर परिवहन विभागाने घेतलेली असून सदर जमीन आता हीं परिवहन विभागीय मालकीची आहे व उर्वरित राहिलेली जमीन झनके यांची अर्धा एकरच्या जवळपास शिल्लक आहे परंतु राहिलेल्या जागेची चतुर सीमा त्यांना अर्ध्या एकरची शासनाने दिलेली नसून त्यांना मात्र याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे रोड टच जवळ असलेल्या शिल्लक जागेमध्ये कोणी दुसराचं त्रयस्थ व्यक्ती जर अतिक्रमण करत असेल तर ती जमीन आमची मालकीची होती तर आम्हाला पहिला अधिकार का नसावा असा प्रश्न त्या ठिकाणी झनके यांनी केला आहे आमचे काही क्षेत्र अजूनही पडीत आहे. मात्र सध्या त्या क्षेत्रावर एक तृतीयपक्षीय व्यक्ती बांधकाम करत असल्याचे आढळून आले आहे. त्या व्यक्तीकडे बांधकामासाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत परवानगी नसून बांधकाम नेमके कुठल्या आधारे चालू आहे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती मागवली आहे जर यांना शासन बांधकाम करण्यासाठी परवानगी देत असेल तर जमीन आमच्या असून आम्हाला का नाही असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलेया संदर्भात त्यांनी संबधित कार्यालयास लेखी निवेदन देत सदर अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्याची आणि आतापर्यंत केलेले बांधकाम निष्कषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, जर यावर त्वरित कारवाई न झाल्यास संबंधित कार्यालय व अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या इसमाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही तक्रार



