तेल्हारा शहरातील महिलांची मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीसांना राखी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अकोला जिल्हा प्रतिनिधी तेल्हारा दि.१३ ऑगस्ट|
स्थानिक तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधून रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठवण्याचा नुकताच संकल्प घेण्यात आला होता. यानिमित्त
यानिमित्त दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक सहा येथील माऊली मंदिर जवळील सभागृहात भारतीय जनता पार्टी तेल्हारा मंडळ यांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक बूथ , प्रत्येक प्रभागातुन १०० च्या संख्येत राख्या पाठवण्याचा संकल्प हाती घेण्यात आला होता व हा संकल्प राख्या पाठवून नुकताच पूर्ण करण्यात आला . तसेच हा कार्यक्रम बुथ क्रमांक २६७, २६८ मध्ये घेण्यात आला. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला अध्यक्ष सौ. जयश्रीताई फुंडकर , तालुका मंडल अध्यक्ष गणेश रोठे , महिला तालुका मंडळ अध्यक्ष सौ. मोनिका वाघ , माजी नगरसेवक सुनील राठोड , माजी नगरसेविका सौ. नलिनीताई तायडे , माजी नगरसेविका , सौ. आरतीताई गायकवाड , गजानन गायकवाड , विठ्ठल भाकरे, बूथ प्रमुख प्रमोद सोनटक्के , देवीलाल गव्हाणे , किरण वजीरे , तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी , पदाधिकारी , कार्यकर्ते यावेळी उपस्थिती होते.



