खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

राख विसर्जनाऐवजी वृक्षारोपणाचा आदर्श; अंतुर्ली येथे पाटील (निकम) परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील स्वर्गीय दादासो. माणिकराव नामदेवराव (निकम) पाटील यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविला. त्यांच्या तिसऱ्या (खारी सावटण्याच्या) कार्यक्रमानिमित्त पारंपरिक पद्धतीने राख विसर्जन न करता स्मशानभूमीत वृक्षारोपण करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दि. २० जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने स्वर्गवासी झालेल्या माणिकराव पाटील यांच्या स्मरणार्थ लावण्यात आलेला वृक्ष त्यांच्या आठवणी सदैव जिवंत ठेवेल, तसेच पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी कृषिरत्न दिनेश पाटील, प्रकाश किसन बकाल, सुनील माणिकराव पाटील, अनिल माणिकराव पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील, नरेश ज्ञानेश्वर पाटील, पंकज पाटील तसेच समस्त पाटील (निकम) परिवार उपस्थित होता.

समाजात पर्यावरणपूरक परंपरांचा स्वीकार व्हावा आणि प्रत्येकाने आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ किमान एक वृक्ष लावावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

“झाड हेच जीवन… वृक्षारोपण हीच खरी श्रद्धांजली.” या संदेशाने हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button