खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणाभुसावळमहाराष्ट्रविदर्भ

प्रभाग क्रमांक ४ मधील तीन अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी नगरसेवक हाशम शाह यांची मागणी

अंगणवाड्यांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मधील तीन अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती करून बालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेवक हाशम शाह कासम शाह यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), भुसावळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक ४ मधील अंगणवाडी केंद्रांमध्ये परिसरातील लहान बालके, माता आणि लाभार्थी नियमितपणे येत असतात. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या दुरुस्तीची कामे तसेच मूलभूत सुविधांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अंगणवाडी केंद्र क्रमांक १७ मध्ये बाहेरील ओट्याचे बांधकाम, खिडक्यांना जाळ्या बसविणे तसेच अंगणवाडीच्या ग्राउंडमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

अंगणवाडी केंद्र क्रमांक 18 मध्ये नवीन खिडक्या व दरवाजा बसविणे, वरचा स्लॅब दुरुस्त करून फिनिशिंग करणे, टॉयलेट व बाथरूमची दुरुस्ती, वर पाण्याची टाकी बसविणे, पिण्याच्या पाण्याची टाकी बसविणे, नवीन ओटा तयार करणे तसेच ग्राउंडमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्र क्रमांक १९ मध्ये वरचा स्लॅब दुरुस्त करून फिनिशिंग करण्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सदर दुरुस्तीच्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तिन्ही अंगणवाडी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करावी, आवश्यक कामांची नोंद घ्यावी, तांत्रिक अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करावा आणि नियमानुसार उपलब्ध शासकीय निधी किंवा संबंधित योजनेंतर्गत ही कामे मंजूर करून तातडीने पूर्ण करावीत, अशी विनंती नगरसेवक हाशम शाह यांनी केली आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये इमारतींची सुरक्षितता, छत, फरशी, दरवाजे-खिडक्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि बालकांच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या इतर मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे. या सुविधांच्या अभावामुळे बालकांच्या सुरक्षिततेवर किंवा आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रभागातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरात लवकर मंजूर करून पूर्ण करावीत आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेवक हाशम शाह कासम शाह यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button