बुलढाणामहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन; महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार व स्वच्छता मोहीम संपन्न.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय आदरांजलीदेऊळगाव राजा (दि. २२ जुलै २०२६):महाराष्ट्र राज्याचे लाडके व कतृत्ववान नेते, दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांची जयंती आज राज्यभरात शासकीय व सर्वपक्षीय स्तरावर साजरी करण्यात आली. यादरम्यान देऊळगाव राजा शहरात एका विशेष सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शहरातील विविध महामानवांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. तसेच, जनमानसात संदेश पोहोचावा यासाठी शहरात एका विशेष स्वच्छता मोहिमेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या अभिवादन व स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. मनोजभाऊ कायदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरुणजी मोकळ, नगराध्यक्ष मा. सौ. माधुरीताई शिपने, गटनेते प्रदीप वाघ, तसेच उपाध्यक्ष वनिताताई भुतडा, यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज, देऊळगाव राजा येथे एका विशेष सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील आणि शहरातील सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वर्गीय दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित विविध पक्षांच्या नेत्यांनी स्वर्गीय दादांच्या राजकीय कारकीर्दीतील आठवणींना उजाळा दिला. ‘त्यांचे धडाडीचे नेतृत्व, प्रशासनावरील मजबूत पकड आणि राज्याच्या विकासातील त्यांचे योगदान नेहमीच मार्गदर्शक ठरेल,’ अशा भावना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते या अभिवादन सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय अजितदादांच्या लोकसंग्रहाची आणि त्यांच्या कार्याची प्रचिती आजच्या या सर्वपक्षीय गर्दीवरून पुन्हा एकदा दिसून आली.
या अभिवादन कार्यक्रम ला उपस्थिती,भाजप नेते डॉ गणेश मांटे, डॉ सुनीलभाऊ कायंदे, संतोष भाऊ खांडेभराड, शिपने साहेब, राजेशजी भुतडा,दीपक बोरकर, सिद्दिकी सेठ, सुभाष दराडे सर, गबाजी कुठे,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते, गणेश सवडे, दिनकर जाधव, राजेश इंगळे ,करीम सय्यद, तसेच राष्ट्रवादी उपाध्यक्ष जिल्हा प्रकाश भाऊ गीते, शंकर तलबे, प्रवीण धनावत, सुनील शेजुळ, राजीव शिरसाठ,, सदाशिव मुंडे, सरपंच गजानन काकड, गोविंद तिडके,यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या प्रशासकीय आणि विकासात्मक कार्याचे स्मरण केले.

शिवसेना शिंदे गटाच्या अनुपस्थितीची चर्चा:

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, राज्यात आणि केंद्रात मित्रपक्ष म्हणून एकत्र असलेल्या शिवसेना (शिंदे गट) या पक्षाचा एकही नेता किंवा कार्यकर्ता या सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. मित्रपक्ष असूनही शिंदे गटाने या कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ आता शहरात आणि राजकीय वर्तुळात कमालीची चर्चेचा विषय ठरत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button