Uncategorized

पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आज शेगावात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील शनिवार, २७ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

पाटील यांच्या दौऱ्यानुसार, २७ जुलै रोजी सकाळी ५.४० वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल. सकाळी ७.३० वाजेपर्यंत शासकीय विश्राम भवन येथे आगमन व राखीव राहणार असून त्यानंतर शासकीय विश्राम भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समिती व डोंगरी

विकास आढावा बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक घेतील. दुपारी १.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक घेतील. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत राखीव राहणार आहे. दुपारी ३ वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव राहील. त्यानंतर सोईनुसार बुलडाणा येथून शेगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. रात्री ९ वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button