खानदेशजळगावा जिल्हा

येथे नगरसेवक बदलून मिळेल!

जळगाव शहरातील रस्ते, गटार,पाणी,सफाई, शाळा ,ओपन स्पेश, दुकाने याची परिस्थिती पाहाता सांप्रत नगरसेवक फेल ठरलेले आहेत.म्हणून आम्ही जळगाव जागृत जनमंच ने प्रत्येक प्रभागात जाऊन या बाबींचे निरीक्षण केले.निधी तर गेला आणि ही कामे झालीच नाहीत.असे कसे झाले? म्हणे रेती नाही.म्हणे डिझाईन हरवली.म्हणे पावसाळा लागला.म्हणे लेबर नाही.ही बहाणेबाजी आम्ही खपवून घेतली नाही.
  तर काही प्रभागात आम्ही लोकांना जागृत केले.बैठका घेतल्या, आंदोलन केले.वातावरण गरम झाले.नगरसेवकांच्या विरोधात मोहीम सुरू केली कि,"आत्ताचे नगरसेवक पुन्हा नकोच."आणि काय ?नगरसेवकांचे धाबे दणाणले.ब्लड प्रेसर वाढले.हारण्याची भीती निर्माण झाली.आणि मग तेच नगरसेवक आता त्या त्या प्रभागात येऊ लागले.त्यांनी कमाल केली.दोन वर्षांपासून दिलेली वर्क ऑर्डर चे काम सुरू केले.मक्तेदारांचे हातापाया पडले.काहीही करा आणि गटार बांधा.काहीही करा रस्ता बनवा.असे कसे झाले?
 गांधी मार्केट, रायसोनीनगर, तांबापुरा , जुना खेडीरोड, भिकमचंद नगर, शिवाजीनगर, हरिविठ्ठलनगर, खोटेनगर, मास्टर कॉलनी मधे याच नगरसेवकांनी कामाच्या वर्क ऑर्डर दोन तीन वर्षांपासून देऊन टाकल्या.टेबलावर कागदावरच काम दाखवले.गटार महानगरपालिकेच्या टेबलाखालून वाहात होती.तिचे कामाचे बील पेमेंट सुद्धा दिले .चोरांनी हिस्सा वाटा घेऊन टाकला.म्हणे हाच पैसा पुढच्या निवडणुकीत मतदारांना मतांसाठी देऊ.
 पण आमच्या जनजागृती मुळे गोची झाली.आम्ही नगरसेवकांची बोची ओळखली.गटार बनवा ,नाहीतर उमेदवारी करुच नका.रस्ता बनवा , नाहीतर उमेदवारी करूच नका.मामा आले.भाचा आले.भाचेजावई आले.आश्चर्य ! रस्ता व गटारीची कामे सुरू झाली.नगरपालिकेच्या टेबलाखालून वाहात वाहात ही गटार मामाच्या, भाचाच्या,भाचेजावईच्या घरापर्यंत पोहचली.गटारीचे पाणी येथेच मुरत होते.
 मागील पांच वर्षांपासून हिच मोहीम जळगाव महापालिकेत चालू आहे.चालू नगरसेवकांनी चांगली गटारीचे टेंडर आपल्याच नातेवाईकांना दिले.कारण गटार चांगली असेल तर लोक बोंबा मारत नाहीत.चालू नगरसेवक व आमदारांनी चिकणा रस्त्याचे टेंडर आपल्याच भाऊ,भाचा,भाचेजावईला देऊन टाकले.रस्त्यावर डांबर टाकून सारवले.जसे शेणाने घर सारवतो.लाखाचे काम करून दहा लाख उपटले.काही ठिकाणी तर काहीच काम न करता निधी उपटला.
ही माहिती कोणालाही महानगरपालिकेत मिळणार नाही.मिळत नाही.म्हणून आम्ही बाहेरून जनतेचा प्रेसर मारला.निवडून न आणण्याचा दम भरला.तेंव्हा कुठे चोर नाचायला लागले.

नागरिकांनो,हे तर हिमनगाचे टोक आहे.खरे मोठे भोक तर महानगरपालिकेत आहे.तेथपर्यंत पोहचणे कोणालाही जमले नाही.नगरसेवक स्वपक्षातील असो कि विरोधातील, सर्वांनी मथ्थी केली आहे.तेरी भी चूप और मेरी भी चूप.एकाच खाटेखालचे मुसाफिर.तुझे माझे काम एकच.निर्लज्जपणाचा कळस केला आहे.
खात्री करायची असेल, माहिती घ्यायची असेल तर ,घ्या मामांना समोर! आभिर,गुलाल,उडीद,झाडू मारून घुमवा.सांगा मामा ,निधीचे भोक कुठे कुठे आहे?मामा कधीच सांगणार नाहीत.समोर सुद्धा येणार नाहीत.विचारा गिरीशभाऊंना.हे आपले शांघाय आणि हॉंगकॉंग वाले.ते तर समोरच बसणार नाहीत.बोलवा महापौर आणि विरोधी पक्षनेता महाजन कपलला.ते तर नेहमीच गायब असतात.त्यांना या कामात फुरसत नाही.तांबापुरा फुकटपुरा पाण्यात बुडाले होते तेंव्हा हे कपल वह्या पुस्तके वाटत होते.रोम जळत होते,निरो व्हायोलिन वाजत होता.
हा कळस ढासळल्याशिवाय नगरपालिकेतील भोक सापडणार नाही.त्यासाठी नगरपालिकेत नव्या दमाचे नवे शिलेदार नगरसेवक निवडून देणे आवश्यक बनलेले आहे.आणि हे शक्य आहे.तुम्ही आपण ठरवले तर शक्य आहे.
नागरिकांनो, किमान शिक्षित, उच्चशिक्षित नागरिकांनो तुम्ही तरी जागृत व्हा.डॉक्टर, इंजिनिअर, वकिल, प्रोफेसर, व्यापारी पुढे या.शिक्षित उच्चशिक्षित लोक कोपऱ्यात बसले आहेत आणि अडाणचोट,टग्गे, सोंगाडे,बोंगाडे कारभार करीत आहेत. आता आपली महानगरपालिका सभ्य,सज्जनांनी चालवायची आहे.एक एक रूपयाचा हिशोब द्यायचा आहे.एक एक रूपयाचा हिशोब घ्यायचा आहे.नगरपालिका हे पोट भरण्याचे साधन नाही,अशाच लोकांना आम्ही सोबत घेत आहोत.ज्यांना उदरनिर्वाहापुरते कमवता येते,अशाच लोकांना सोबत घेत आहोत.ज्यांना समाजाची लाज लज्जा शरम आहे अशाच लोकांना सोबत घेत आहोत.
जळगाव शहरातील आपापल्या भागात,प्रभागात , कॉलनीतील समस्यांवर अभ्यास करा.स्थानिक लोकांमधे संभाषण ,भाषण करा.आमची जळगाव जागृत जनमंच ची टिम सांगाल तेंव्हा हजर होईल.एनडीआरएफ सारखी.ती नॅचरल डिझास्टर रीलीफ देते आम्ही पॉलिटिकल डिझास्टर रिलीफ देत आहोत.

… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button