खानदेशजळगावा जिल्हा
प्रामाणिक नगरसेवक भाजपला का नको?

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील आदर्श नगर मधील माजी नगरसेवक श्रीमान पृथ्वीराज सोनवणे यांची आम्ही शिवराम पाटील व राकेश वाघ,भेट घेतली.
श्री पृथ्वीराज सोनवणे हे लहान पणापासून म्हणजे हाफ चड्डीत असतांनापासून आरएसएस मधे आहेत.तेथे खूप चांगले संस्कार यांचेवर केलेत.खोटे बोलायचे नाही.चोरी करायची नाही.कमीशन घ्यायचे नाही.लांच घ्यायची नाही.पुढे भाजप ला बरे दिवस आलेत.तेंव्हा यांना २०१३ ला भाजपने उमेदवारी दिली आणि नगरसेवक निवडून आणले.हे महाशय महासभेत मुद्देसूद बोलत.मक्ता घेतला नाही.कमीशन खाल्ले नाही.पैसे कमावले नाहीत म्हणून हाच त्यांचा दोष भाजपला दिसला.असा माणूस आपल्या कामाचा नाही.म्हणून सोनवणे यांना २०१८ला नगरसेवक म्हणून उमेदवारी दिली नाही.त्या ऐवजी धुळे जेलमधून पांच कैदी धरुन आणले. नगरसेवक म्हणून निवडून ही आणले.खोटे बोलले पाहिजे.चोरी केली पाहिजे.कमीशन घेतले पाहिजे.लांच घेतली पाहिजे.कामाचा ठेका घेतला पाहिजे.ओपन स्पेस बळकावली पाहिजे.अशी गुणवत्ता असलेले ७५पैकी तब्बल ५७नगरसेवक भाजपने निवडून तर आणले पण यापैकी ३२ नगरसेवकांनी भाजपला इंगा दाखवला.भाजप सोडून शिवसेनेत पळून गेले. सिलेक्शन तसे इलेक्शन.इलेक्शन तसे करप्शन.यामुळे आमदार सुरेश भोळे आणि मंत्री गिरीश महाजन यांची फटफजिती झाली.नाचक्की झाली.आता पुन्हा असेच सराईत गुन्हेगारांचा शोध चालू आहे.एकसे बढकर एक!
भाजप मधील कोणीतरी प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी ही अ निती ,कु निती,दुष्ट निती दिल्लीश्वरांना सांगितली पाहिजे.जेथे अटलबिहारी वाजपेयी राजधर्म सांगत असत तेथे आता चोरधर्म अनुपालन होत आहे.आत्ताच याच प्रभाग मधील एका नगरसेवकाने ओपन स्पेश खिशात घालण्याचा प्रयत्न केला होता.पण आम्ही जळगाव जागृत जनमंच ने हाणून पाडला.जय श्रीराम,वंदे भारत,वंदे मातरम् म्हणून ही उपयोग झाला नाही.मुहंमे राम बगल में सुरी.
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



