माणसे जनावरासारखी वागली तर काय करणार?

माणसे जनावरासारखी वागली तर काय करणार?
ज्या समाजाचा उल्लेख शेतकरी शेतमजूर कुणबी मराठा दलित पिडीत वंचित म्हणवून करीत आहात,तेच लोक भाजप ला मत विकून टाकतात.हेच आपले मत भाजपला विकतात तर मग,मत विकत घेणारा भाजप यांचा विचार करील काय?शक्यच नाही.पैसा फेका आणि निवडणूक जिंका.
मी जळगाव शहर व जिल्ह्यात काम करतो.माझा स्वानुभाव आहे की, आम्ही ज्या गरीबांच्या हक्काची लढाई लढतो,जिंकतो तेच लोक निवडणुकीत मत विकून टाकतात.पैसा किंवा खानपान घेऊन.
जर कोणाला हे सत्य जाणून घ्यायचे असेल तर या सोबत,मी दाखवतो,हा सुर्य हा जयद्रथ.
काही लोक ईव्हीएम कडे बोट दाखवतात.पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की, निवडणुकीत हेच गरीब लोक दिडशे,दोनशे रूपये घेऊन भाडोत्री मोर्चा काढतात.त्यांचे मंडपात जाऊन बसतात,जेवतात.हे तर लपवण्यासारखे नाही.हे तर स्वताहून केलेले वर्तन आहे.कोणी बळजबरीने ओढून नेले नाही.चाकू सुरी पिस्तूल दाखवला नाही.दाखवला फक्त पैसा.आणि गेले पैसा पाहून.
जळगाव शहरातील प्रभाग ११मधे हरिविठ्ठलनगर ही गरीब आणि झोपडपट्टी वस्ती आहे.मी यांचेसाठी रामानंद नगर घाट रस्ता आंदोलन करून बनवला.खंडेराव नगर पुल आंदोलन करुन बनवला.आंदोलन करून चारशे केसरी कार्ड बंद केलेले चालू केले.तरीही हिच माणसे भाजप चे उमेदवारांच्या मंडपात बसत होती,जेवत होती.मोर्चाला दिडशे रूपये रोजाने जात होती.हजारो लोकांनी तर उमेदवारांचे घरी जाऊन मतदान कार्ड जमा केले आणि पांचशे रूपये मतांचे घेतले.तेच कार्ड मतदान बुथ वर परत घेतले.
हे तर वास्तव आहे.डोळ्याला दिसणारे सत्य आहे.तर मग, कोणीही न दिसणाऱ्या कहाणी सांगून उपयोग नाही.जर लोकच स्वेच्छेने भाजप ला शरण जात असतील,मत विकत असतील तर आपण काय करू शकतो?जर अशीच मानसिकता असेल आणि तशीच कृती करीत असतील तर आपण काय करू शकतो? याचमुळे ओबीसी, शेतकरी, शेतमजूर,कुणबी,मराठा व इतर गरीब जाती जमाती खितपत पडलेल्या आहेत.बकरी लांडगा कडे जात असेल तर कोण वाचवणार?
आम्ही उपरोक्त लोकांसाठी काम करतो.ती माणसें पांच वर्षे आमच्या सोबत असतात.पण निवडणुकीत दहा दिवस भाजप कडे स्वेच्छेने जातात.खातात,पितात,मत विकतात.म्हणजे या लोकांनी स्वताला विक्री साठी उपलब्ध केले आहे.जो पैसा देईल तो विकत घेईल.या मुळेच पैसा असलेला पक्ष सहज निवडून येतो.हेच गरीब लोक मत विकून निवडून देतात.सांगा, तुमच्या कडे यावर काय इलाज आहे?
तांबापुरा, फुकटपुरा मधे महापौर व विरोधी पक्ष नेता निवडून आलेत.त्यांच्या चुकीच्या कामामुळे जळगाव ची गटार तांबापुरा फुकटपुरात आणून ठेवली.घरादारात पाणी शिरले.सर्व लोक यांना मदत करीत आहेत.आणि दुसरीकडे हेच पाप झाकण्यासाठी महाजन यांनी यांना वह्या, पुस्तके वाटली.यांनी घेऊन टाकली.जसे , कोंबडीचे पिसे उपटली आणि दाणे टाकले तर ती खाऊन गेली.तिने तर चावा घेतला पाहिजे होता.पण ती जनावर आहे.आणि हे?
जे लोक स्वताला गरीब, दलित,पिडीत, वंचित म्हणवून घेतात,ती का तशी बनलीत?का तशीच पडून आहेत?यांची कारणे मत विक्रीत आहेत.म्हणून जळगावला दारूवाले,रेतीवाले डान्सबारवाले, सावकारीवाले माणसे नगरसेवक नगरसेवक निवडून आलेत.आता तेच मवाली आमदार बनण्याची तयारी करीत आहेत.त्यांना अनुभव आहे, त्यांना खात्री आहे की,आपण या माणसांना जनावरासारखे खरेदी करू शकतो.ही मतांची खरेदी विक्री थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाय करीत आहात ?
माणसे जनावरासारखी वर्तन करीत असतील तर तुम्ही काय करणार?
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



