खानदेशजळगावा जिल्हा

जळगाव शहरातील पाण्याची नासाडी

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधे ही पाईप लाईन खूप दिवसांपासून फुटलेली आहे.किमान पांच घरांना पुरेल इतके पाणी चोवीस तास वाहात आहे.हेच पाणी इतर साठ नागरिकांच्या वाट्याचे आहे.जे मुकाटपणे पाणीपट्टी भरतात.
 येथील नगरसेवक तीन तीन वेळा तेच ते निवडून आले आहेत.एक तर माजी  महापौर आहेत.तरीही येथे कोणीही लक्ष देत नाही.कारण येथील मतदार मतदान करीत नाही,मत विकतो.म्हणून ही अवस्था.
 हा रहदारीचा रस्ता आहे.दिवसातून दोन हजार माणसे येथून वापरतात.पण एकालाही या पाणी  गळतीचे सोयरसुतक नाही.नगरपालिकेत जाऊन तक्रार करण्याची मानसिकता नाही.म्हणून जळगाव शहरातील अशा वस्तीची स्वतंत्र नगरपालिका बनवली पाहिजे.जेथे रस्ता पाणी गटार वीज सफाई शिक्षणाची गरज वाटत नाही.लोकशाही ,संविधानाची गरज नाही.निवडणुक सुद्धा फक्त मत विकून पैसे मिळवण्यासाठीच असावी.
याच कारणे जळगाव महापालिका अधिकारी इकडे फिरकत नाहीत.पण येथून निवडून आलेले नगरसेवक शहरातील सभ्य लोकांच्या डोक्यावर जाऊन बसतात.हे शल्य खटकते.
 पाणी गळतीची जाणिव यांना नसली तरीही महानगरपालिका अधिकाऱ्यांना असावी.कारण हे पाणी वाघूर धरणावरून सुमारे तीस किलोमीटर दुरून ,शुद्ध करून आणलेले आहे.माणसांना पिण्यासाठी.पण वाहाते,जाते गटारीत.जितके पाणी शुद्ध आहे तितके नागरिकांचे मनही शुद्ध असणे आवश्यक आहे.पण नाही.

घाण घंदगी प्यारी है,
यहांकी दुनिया न्यारी है.

… शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button