बुलढाणामहाराष्ट्र

अंढेरा पोलिसात सरकार विरोधात फसवणकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीकर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांचे ठाण्यात आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

चिखलो महायुती सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूवों शेतकऱ्यांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील अंडेरा पोलीस ठाण्यावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात फसवणूक (कलम ४२०) आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे (कलम ३०६) या गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली भरोसा, देऊळगाव धुबे, रामनगर परिसरातील शेकडो शेतकरी पोलीस स्टेशनवर एकत्र आले. त्यांनी निवडणूकपूर्व आश्वासनाची आठवण करून देत सांगितले की,

त्याच विश्वासावर त्यांनी महायुतीला मतदान केले. मात्र, सत्ता स्थापनेनंतर सहा महिने उलटून गेले तरीही सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२५ पर्यंत कर्ज फेडण्याची तंबी दिली होती. या इशाऱ्यामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावात आले असून काहींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना उपविभागीय

पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी आपल्याला “सरकारविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही” असे सांगून ही तक्रार एसपी कार्यालयाकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले. या अनपेक्षित गर्दीमुळे पोलिस प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती. अतिरिक्त पोलिस फोर्स आणि व्हॅन अंदिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या, शेतकऱ्यांची भूमिका ठाम असून त्यांनी स्पष्ट केले आहे की, “जोपर्यंत सरकारविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन थांबणार

नसल्याची भूमिका आंदोलन कर्त्यांनी यावेळी घेतली होती. या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी या आंदोलनात एकनाथ पाटील, देविदास कंकर, समाधान कनकर, प्रकाश अंभोरे, अच्युतराव पाटील, विलास जमले, प्रकाश घुबे, धोंड् पाटील, तेजराव मुंडे, शानेश्वर पाटील, गणेश तुपे, विठ्ठल शेटे, नंदकिशोर भगत, आत्माराम गाडी, समाधान घुगे, एकनाथ दगडू पाटील, परमेश्वर गवते, विलास राऊत, विठ्ठल तुपे, सुरेश पवार, शेषराव जाधव, भगतसिंग पवार, जनार्दनातपट, सदाशिव श्रीकृष्ण डोईफोडे, नारायण पैठणी चव्हाण, लिंबाजी पाटील, जगन्नाथ विकास सोळंकी यांसह शेकडो शेतकऱ्यांनी सह्या केल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button