गुन्हेगारी

युवतीवर अत्याचार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार एका २६ वर्षीय युवतीने काल ४ एप्रिल रोजी शहर पोलीसांत दिली. युवतीच्या तक्रारीनुसार आरोपी आकाश अवधूत सावळे वय अंदाजे ३५ वर्षे, रा.बोर्डा ता. मुर्तीजापूर जि. अकोला याने तक्रारदार युवतीला लग्नाचे आमिष दाखवून त्याचे शेगाव येथील बस स्थानकाच्या मागे असलेल्या भाड्याच्या घरात नेऊन
, वारंवार अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने फिर्यादी युवतीला मारहाण केली व अत्याचाराच्या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ६४ (१), ६४ (२), (एम), ११५(२), ३५१ (२) (३) भान्यासंनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास एपीआय सोनटक्के हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button