महसूल सप्ताह, ठरला फलदायीप्रलंबित प्रश्न लागले मार्गीसंतोष गिऱ्हे माळेगाव बाजारस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा प्रतिनिधी

महसूल सप्ताह-२०२५
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय तेल्हारा यांच्या वतीने पी एम जि.प.केंद्र शाळा माळेगाव बाजार येथे कार्यक्रम संपन्न कार्यक्रमा मध्ये माळेगाव येथील माजी उपसरपंच सलीम खान ओ.एन.वेरुळकर मंडळ तसेच भुमिअभिलेख बद्दल माहिती, मुद्रांक विभागासंबंधीत माहिती पुरवठा विभागासंबंधीत माहीती, अधिकारी यांनी दिली.शेतकऱ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राजस्व मंडळ माळेगाव बाजार येथे तहसीलच्या श्रीमती कावरे मॅडम, मंडळ अधिकारी ओ.एन. वेरूळकर साहेब भुमिअभिलेखचे अधिकारी नोंदणी व मुद्रांक विभाग तेल्हारा चे अधिकारी तसेच माळेगाव ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य, दानापूर येथील पोलीस पाटील संतोष माकोड़े, मुख्याध्यापक प्रल्हाद ठाकरे सर,डॉक्टर अजयजी विखे, तसेच मंडळातील ग्राम महसूल अधिकारी अंकुश मानकर, वारूळकर साहेब, देशमुख साहेब,वाकपांजर साहेब, बुलनकर साहेब, महसूल सेवक किरण नेमाडे, संतोष गव्हाळे, कोतवाल अक्षय शेळके, अमोल ठाकूर, अंगणवाडी कर्मचारी खडसान माॅडम,मानकर माॅडम,शाह माॅडम तसेच मंडळातील सेतू संचालक निखिल चतारे,पत्रकार सुनिल गवई ,,राहुल सावळे,राम इंगळे, मुन्ना इंगळे, नितीन गोखले,पत्रकार संतोष गिऱ्हे तसेच मंडळातील शेतकरी, गावकरी,पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमा मध्ये राशन कार्ड वाटप, उत्पन्नाचे दाखले वाटप, जातीचे दाखले वाटप, सातबारा भूमी अभिलेख कडून शेरी गावठाणातील सनद वाटप, करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंकुश मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बळीराम वारुळकर यांनी मानले.



