महाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर मध्ये नशामुक्ती शपथ व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

हिवरखेड (महेंद्र कराळे) येथील सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिरा मध्ये ओम शांती केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि त्यांना सदाचरणाचे धडे दिले गेले.

यावेळी रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम देखील घेण्यात आला. ओम शांती केंद्र, हिवरखेडच्या प्रमुख रश्मी दीदी व अकोला येथील अर्चना दीदी यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना राखी बांधून त्यांना सद्भावना, शुद्धता व सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमास ओम शांती केंद्र हिवरखेडचे श्री. बाळकृष्ण नेरकर व त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रेम, बंधुभाव आणि नशामुक्त जीवनाची प्रेरणा दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अमोल भोंगाळे सर, शिक्षिका सौ. राऊत मॅडम, सहाय्यक शिक्षक श्री.धर्माळ सर, श्री सोळंके सर श्री कवळकर सर, श्री.खेट्टे सर, श्री. कौलकर सर, श्री.धारपवार सर व शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button