अकोला जिल्हा बामसेफ कार्यकारिणी जाहीर!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
अकोला दि.३०जुलै ; बामसेफ या सामाजिक संघटनेची अकोला जिल्हा कार्यकारिणी घोषित झाली असून भिमराव परघरमोल यांची जिल्हाध्यक्षपदी तर आर. के. वाहूरवाघ यांची महासचिवदी सर्वानवते निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की दि. २७ जुलै २०२४ रोजी सुमनताई तिरपुडे यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील बामसेफ तथा सर्व ऑफशूट विंगच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये अकोला जिल्हा बामसेफ कार्यकारणीची निवड करणे हा मुख्य विषय होता. तेव्हा भिमराव परघरमोल यांची अध्यक्षपदी तर प्रा. आर. के. वाहूरवाघ यांची महासचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सारिका बाडगे उपाध्यक्ष, शालिनी भालेकर सहसचिव, दीपक येलकर कोषाध्यक्ष, तर सदस्यांमध्ये शंकरराव बहाकर, दीपक वाघमारे, हंसराज सहारे, विकास तिरपुडे, विकास ओवे या सर्वांची कार्यकारणी मध्ये वर्णी लागली.



