खोटरे विद्यालय सिरसोली येथे शिक्षण सप्ताह ऊत्साहात साजरा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
सिरसोली दि. २८ ला येथील स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२४ पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला.
दि. २२ जुलै- अध्ययन व अध्यापन साहित्य TLM DAY, दि. २३ ला मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, दि. २४ ला क्रीडा दिवस, यामध्ये विविध देशी खेळ, दि.२५ ला सांस्कृतिक दिवस CULTURAL DAY, महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा, दि.२६ ला कौशल्य व डिजीटल उपक्रम, या बाबत मार्गदर्शन, माहितीपट, दि. २७ ला ‘इको क्लब’ अंतर्गत वृक्षारोपन, चित्रकला, निसर्ग चित्रे, वृक्ष संगोपन. दि २८ ला समुदाय सहभाग दिवस यामध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक सहभोजन असे कार्यक्रम राबविण्यात आले. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.या सप्ताहामध्ये शैक्षणिक साहित्य तयार करणे, कौशल्य सादरीकरण, देशी खेळांचा सराव व माहिती, क्रीडा शपथ, निपुण भारत प्रतिज्ञा, सांस्कृतिक दिवस अंतर्गत वेशभूषा, गायन, नाटिका सादरीकरण, पोस्टर निर्मिती, विविध चित्रे, तक्ते तयार करणे, राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब अंतर्गत वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन, विद्यार्थी सहभाग, वाचन कट्टा इ. कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थीनी कु. समिक्षा वनकर हिने ‘माती काम कौशल्य अंतर्गत’ मूर्ती कला, मातीचे विवीध साहित्य, खेळणी बनविणे या बाबत प्रात्यक्षीक सादर केले.
दि २८ जुलै ला प्रमुख पाहुणे माजी पोलीस पाटील ऋषीकेश खोटरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, सिरसोली चे पदाधीकारी यांनी कार्यक्रमाला सक्रीय सहकार्य करून सहभोजन आयोजीत केले. या प्रसंगी प्राचार्य मिलींद खोटरे, प्रा. संतोष नहाटे , संगीता डाबेराव मॅडम, योगेश मैड, किसन सोलकर, गजानन भारसाकळे, , उमेश तेलगोटे, प्रमोद आखरे , राजेश तेलगोटे, जगदेव कात्रे, निळकंठ काळे, अंजली खोटरे मॅडम, उमेश तेलगोटे, प्रमोद आखरे,इ. उपस्थीत होते.✍️



