मंगळवारी मालेगावात पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिरमराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव ता 1 – मालेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये ता 3 डिसेंबरमंगळवार रोजी पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मधुमेह ,रक्तदाब, ई सी जी ,नेत्र तपासणी व आवश्यकता पडल्यास इतर तपासण्या करण्यात येणार तपासण्या करण्यात येणार आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे शिबिर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुहास वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे .ग्रामीण रुग्णालय व तालुका मराठी पत्रकार परिषद यांनी संयुक्तपणे या शिबिराचे आयोजन केले आहे सकाळी 11.00 वाजता होणाऱ्या या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे व सचिव शिवाजीराव खडसे यांनी केले आहे.



