Uncategorized

आयुष्याचा जोडीदार वधू वर केंद्र: वैजापूर भोंगर्‍या बाजारात डॉ.केतकी पाटीलयांचा पारंपरिक पावरा नृत्यावर ठेका

चोपडा- तालुक्यातील वैजापूर या ठिकाणी भरलेल्या भोंगर्या बाजारास आज गोदावरी फॉउंडेशनच्या संचालीका डॉ.केतकीताई पाटील यांनी भेट देत आदिवासी बंधू-भगिनी समवेत पारंपारिक आदिवासी ढोलाच्या तालावर नृत्यावर ठेका धरत आनंद लुटला.
याचबरोबर आदिवासी महोत्सवात बंधू आणि भगिनींशी संवाद साधून त्यांनी पावरा भाषेचा गोडवा जाणून घेतला, बाजारात फेरफटका मारत त्यांनी अनेक पारंपारिक पदार्थांची माहिती जाणून घेत मनसोक्‍त खरेदी करत उत्साह वाढवला. वैजापूर ता. चोपडा येथे आदिवासी समाजाच्या रूढी परंपरेनुसार भोंगर्‍या बाजार हा गेल्या अनेक वर्षापासून भरवला जातो याचा इतिहास ज्ञात नसला तरी या भोंगर्‍या बाजारामुळे आदिवासी समाजातील संस्कृती आणि परंपरा टिकून राहिली आहे.या बाजारात खाद्य पदार्था पासून, गृह सजावट, खेळणी यासह आदिवासी पावरांनी बनवलेल्या जिन्नसांची मांडणी केली असते. आदिवासी पाड्यात होळीच्या १० दिवस अगोदरपासून होळीपर्यत हा भोंगर्‍या बाजार भरतो. या बाजाराचे महत्त्व व संस्कृती जाणून घेत डॉ केतकी पाटील या सहभागी झाल्यात, या प्रसंगी आदिवासी बंधू भगिनीना नृत्य करतांना पाहून डॉ केतकीताई यांनादेखिल मोह आवरला नाही त्यांनी थेट नृत्यात सहभागी होत ठेका धरला. यावेळी डॉ.केतकी ताई पाटील यांच्या सोबत मोरचिडा येथील रोहित शिवराम पावरा, सौ.ममता पंडित पावरा, अमोल शिवराम पावरा, पंडित छत्रसिंग पावरा, पंकज गुलाब पाटील, अधिकार सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button