बुलढाणामहाराष्ट्रमुबईविदर्भसामाजिकसांस्कृतिक

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा..

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आजच्या दिवशी म्हणजे १४आॕक्टोम्बर १९५६ ला आपले बाबासाहेब किती खूश असतिल याचा विचार सुद्धा करता येणारं नाही,
कारण ज्या समाजाला मनुच्या घाणेरड्या दलदलीतून बाहेर काढन्यासाठी आपले बाबा रात्रन दिवस झटत होते लढ्यावर लढे देत होते …मनुवाद्यावर बुद्धीच्या जोराने तूटून पडत होते या सर्व परिश्रमाच फळ बाबासाहेबाना चौदा आॕक्टोम्बर एकोनाविससे छप्पन या दिवशी मिळणारं होते…
चौदा आॕक्टोम्बरची पहाट चैतन्यमय उगवलेली पहाट पक्षांच्या किलबिलाटासह थंड्यागार सोनेरी वा-याच्या झुळकेने बाबासाहेबाना जाग आली…मणात आनंद मावत नव्हता ..चेहऱ्यावर हास्य खेळत होते…
बाबासाहेब मनाशीच प्रसन्नतेची कुजबुज करायचे …
बाबासाहेबानी सकाळी पाचलाच स्नान करून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन दिवस निघन्याची वाट बघत होते…
बाबासाहेबाना आपल्या समाजाला गुलामीतून मुक्त करायच होत…त्याना माणूस बनवायच होत…त्यांच स्वतंत्र त्याना द्यायच होत….
म्हणून बाबासाहेब खूपच खूश होते….
सोबतच माईसाहेबही पांढरी साडी घालून तयार झाल्या…
बाबासाहेबांच्या चेहऱ्याला एकिकडे आंनद ओसांडत होता ..तर एकिकडे कुठेतरी काळजात चुरचुर वाटत होती…
बांधवानो ती चुरचुर म्हणजे काय…तर ती चुरचुर म्हणजे जेव्हा आपल्या आई माता रमाबाई बाबासाहेबाना म्हणाल्य होत्या कि साहेब मला पंढरपूला जायाचय …तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते रामू अग त्या पंढरपूरात आपल्या जातीला स्थान नाही ..आपल्याला तिथे विठ्ठलाच्या पायरीजवळही कुणी उभे करणार नाही…म्हणून मी असे एक समतेचे पंढरपूर तयार करिन कि जिथे माणसाला माणुस्कीचा दर्जा मिळेल….
आणि बांधवानो हेच ते नागपुरातील दिक्षाभुमीवरील समतेच पंढरपुर बाबासाहेबानी तयार केलेल ..खंत एकच कि हे पंढरपूर पाहन्यासाठी बाबासाहेबांची लाडकी रामू हयात नव्हती म्हणून बाबासाहेब थोडेसे दुखी होते…
सकाळचे नऊ वाजत आलेले बाबासाहेब माईसाहेबासोबत दिक्षा भुमीच्या प्रवेश द्वारावर आपल्या मोटारीतून उतरले ..
बाबासाहेबांच्या घोषणानी सर्व धरणी आकाश गुंजलेले ..
एवढा मोठा अमाप जनसमुदाय बघून अक्षरशः बाबासाहेबांचे डोळे दिपलेले..बाबासाहेबाना सुद्धा याची कल्पना नव्हती कि एवढा मोठा भिमसागर या समतेच्या पंढरपूरात जमा होईल म्हणून ..पण बाबासाहेबांच्या हाकेला हाक देऊन सर्व देशातून समाज बांधव गोळा झाला होता…बाबासाहेब मंचावर पोहचले घोषना सुरु होत्या..बाबानी मंचावरून नजर फिरवली नजर पुरे पर्यंत जिकडे तिकडे भिमसागरांच्या लाटाच लाटा दिसत होत्या…
बाबासाहेब म्हणाले कि अरे १९३५ ला येवले या ठिकाणी धर्मतंराची घोषणा तर फक्त मी एकट्यानीच केली होती…
” मी हिंदू म्हणून जन्माला आलो , पण हिंदू म्हणून मरणार नाही ! “
आणि आज या ठिकाणी माझ्या बोलन्यावर विश्वास ठेऊन लाखो बांधव जमलेत..
कदाचित् ही गरदी पाहून बाबासाहेबाना आसही वाटल आसेल कि एक दिवस माझा समाज नक्कीच या देशाची शासनकर्ती जमात बनल्याशिवाय राहणार नाही……
बाबासाहेबानी गर्जना करत आसलेल्या बांधवाना हातानेच पालऊन शांत राहन्याचे आव्हान केले …एवढा जनसागर पण बाबासाहेबांच्या इशा-यावर सुई पडली तरी तिचा आवाज येईल एवढा शांत झाला..बाबासाहेबानी तथागथ बुद्धाला त्रिवार वंदन केले..आणि भंते गुरु चंद्रमुणीनी बाबासाहेब माईसाहेब व मंचावारील मान्ययवराना बौद्ध धम्माची दिक्षा दिली..नंतर बाबासाहेबानी आपल्या जमलेल्या लाखो बांधवाना बुद्धं…सरणं …गच्छामी ..म्हणत त्रिशरन पंचशील व बाविस प्रतिज्ञासह सर्वाना माणूस बनऊन मनुवाद्याच्या गुलामगीरीतून कायमचे मुक्त केले …या वेळी धरणी आणि आकाश सुद्धा एकाच वेळी बुद्धं ..सरणं….गच्छामीच्या सुरात धुंद होते….
आणि बांधवानो म्हणून मी अनिल खरात लिंगेकर तुम्हांला छातीवर हात ठेऊन सांगू इच्छितो कि आपण सर्व बहूजन एक होऊन आपले बहूजन हृदयसम्राट अदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्यास येणाऱ्या 2024 च्या निवडनुकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्नं पूर्ण झाल्याशिवाय राहणारं नाही…..

म्हणून आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने आपणा सर्वाना शुभेच्छा देऊन मी म्हणू इच्छितो…

“या या सगळेजण
बाळासाहेबांचा हात धरू…..
बाबासाहेबांचे स्वप्न आपल्या
आता आपणच ते पूर्ण करू…”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button