वानखेड येथे १३ मार्च रोजी भव्य कबड्डी स्पर्धा; विजेत्या संघासाठी ६१ हजारांची जंगी लूट….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर दि. ११ मार्च २०२६
तालुक्यातील वानखेड येथे जय मिलिंद क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १३ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी बस स्टँड, वानखेड (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथे रंगणार असून परिसरातील कबड्डीप्रेमींमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत ६ खेळाडू व ५ राखीव खेळाडू असा संघ सहभाग घेऊ शकणार आहे. विजेत्या संघासाठी ६१ हजार रुपयांची जंगी लूट ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी ९०० रुपये तर तक्रार फी १००० रुपये ठेवण्यात आली आहे.
🏆 पारितोषिक
🥇 प्रथम पारितोषिक – ३१,००० रुपये
(मा. नंदकिशोर भाऊ पुंडे – ता. संघटसचिव, वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर)
🥈 द्वितीय पारितोषिक – २१,००० रुपये
(मा. संदीप भाऊ वानखेडे – युवा नेता, वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर)
🥉 तृतीय पारितोषिक – ११,००० रुपये
(मा. किशोरभाऊ भिंडे – ता. अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)
विशेष बक्षिसे
उत्कृष्ट रेडर – १५०० रुपये
उत्कृष्ट पकड – १५०० रुपये
सिद्धहस्त संघ – २००१ रुपये
या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मा. देवाभाऊ हिवराळे (जि. उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा) यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच कार्यक्रमास मा. प्रतापभाऊ गांधी (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व पारितोषिक वितरक म्हणून मा. संदीपभाऊ वानखेडे, मा. किशोरभाऊ भिंडे आणि मा. आशिषभाऊ दुंदळे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय मिलिंद क्रिडा मंडळ, वानखेड व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते परिश्रम घेत असून परिसरातील कबड्डी संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ठिकाण: बस स्टँड, वानखेड ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा
दिनांक: १३ मार्च २०२६ शुक्रवार….



