बुलढाणामहाराष्ट्र

एम.बी.ए. च्या शिक्षणा सोबत कार्पोरेट सेक्टरमध्ये नौकरी अशी दुहेरी कामगिरी करत हिवरखेडच्या विशाल गिऱ्हे चे सेट परीक्षेत घवघवीत यश!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता. प्रतिनिधी

हिवरखेड :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. एकूण १ लाख ९ हजार २५० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत केवळ ७२७३ उमेदवार पात्र ठरले असून पात्र ठरलेल्यांची टक्केवारी फक्त ६.६६ इतकीच आहे. लक्षावधी परीक्षार्थींपैकी एवढे कमी विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही या परीक्षेत उज्वल यश मिळविलेल्या हिवरखेड येथील विशाल संजय गिऱ्हे याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केल्या जात आहे. विशेष म्हणजे विशाल ने एम.बी.ए. करून कार्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असताना दुहेरी कामगिरी करीत हे यश प्राप्त केले. पालकांच्या आशीर्वादाने आणि त्याचे गुरुजन डॉ स्वाती दामोदरे मॅडम, डॉ विजयकुमार गवई सर आणि डॉ महेश डाबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून या परीक्षेत यशस्वी झालो असे मनोगत विशालने व्यक्त केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button