जातीवाद निर्माण करणाऱ्या माणसाला तत्काळ कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर
सविस्तर वृत्त असे की ऐरोली येथील साईनाथ नगर परिसरातील विशाल महाडिक नामक इसम हा तिथल्या वस्तीत आपले वर्चस्व निर्माण करत होता. आणि बौद्ध धर्माच्या काही लोक तिथे राहतात. त्यांना जातीवाचक बोलणे तसेच धमकी दाखवत होता. येथील काही लोकांनी संभाजी ब्रिगेड चे तसेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते दीपक पहूरकर यांना याची सूचना देण्यात आली. तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाऊन घेऊन त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. जातीवाद निर्माण करणे हा कठोर गुन्हा असून अजूनही याचा विसर बऱ्याच जणांना पडला आहे. ऐरोली पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली. यावर पोलीस स्टेशन चे धस साहेब यांनी आश्वासन दिले की योग्य ती कारवाई याबाबत करण्यात येईल. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.



