क्राईमगुन्हेगारी

बस स्थानकावरील दोन प्रवाशांचा खिसा कापला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव बस स्थानकावरील घटना

शेगाव बसमध्ये चढत असताना दोन प्रवाशांचा खिसा कापला गेल्याची घटना उघडकीस आली. घटनेची तक्रार शेगाव शहर पो.स्टे.ला देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात खिसेकापूच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेसंदर्भात सुभाष जनार्दन वानखडे (५०) रा. शिरसगाव देशमुख ता. खामगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१५ वाजताचे सुमारास शेगाव बस स्थानकावर खामगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील १४ हजार २०० रूपये व दुसरे प्रवाशी नामे कडुबा मनाजी सनान्से यांच्या खिशातील ६ हजार ९७० रूपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने काढून घेतले. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोहेकॉ संतोष गवई हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button