तेल्हारा येथे आजपासून महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाचे आयोजन! नागरिकांनी घ्यावा लाभ ; तहसिलदार समाधानजी सोनवणे यांचे नागरिकांना आवाहन! विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

दि.1 ऑगस्ट 😐 शुक्रवार दिनांक 01 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात महसूल दिनानिमित्त , महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून आपल्या तेल्हारा तालुक्यामध्येही शुक्रवार दिनांक 01 ऑगस्ट 2025 ते 07 ऑगष्ट 2025 या कालावधी मध्ये “महसुल सप्ताह 2025” साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्त तेल्हारा तालुक्यातील , महसुल विभागामार्फत दिनांक 1 ऑगस्ट, 2025 रोजी “महसूल दिन” व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत “महसुल- सप्ताह-2025” राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने तहसिल कार्यालय तेल्हाराच्या वतीने पुढील प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्वप्रथम शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी “महसुल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ” करणे. तसेच “महसुल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ” आदींचे आयोजन तेल्हारा तहसील कार्यालय येथे करण्यात येत आहे.
यानंतर शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी “शासकीय जागेवर सन 2011 पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबाना सदर अतिक्रमीत जागांचे पट्टे वाटप करणे बाबत कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि.3 ऑगस्ट रोजी “पाणंद / शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे”.

सोमवार दि.4 ऑगस्ट रोजी
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय मध्ये राबविणे”. मंगळवार दि.5 ऑगस्ट
रोजी “विशेष सहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) न झालेल्या लाभार्थ्याना घरभेटी करुन डी.बी.टी. करुन अनुदानाचे वाटप करणे” तसेच बुधवार दि.6 ऑगस्ट रोजी “शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकुल करणे/ सरकारजमा करणे) निर्णय घेणे”.
व गुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी
“M-Sand” धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसुल सप्ताहाची सांगता करणे आदि समारभाचे” आयोजन करण्यात आले आहे.
तरी तेल्हारा तालुक्यातील सर्व नागरीकांनी “महसुल सप्ताह-2025” च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या वरील नमूद कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेल्हारा तहसीलचे वि. तहसीलदार समाधानजी सोनवणे यांचेकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



