मुक्ताईनगरात पत्रकारांच्या सर्तकतेने लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांना केला स्वाधीन(प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :–

सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा अलीकडेच काही दिवसांपूर्वी स्वतः मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः एक गाडी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेली होती त्यामध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच सुद्धा स्वतः चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना सांगितले होते त्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन सुद्धा झालेले आहे त्याला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच आज मध्यप्रदेशातील बुरहाणपुर वरुन मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा पत्रकार यांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिली
सविस्तर वृत असे की दि.9 रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे मुक्ताईनगर मार्गे रावेर खासगी कामासाठी जात असतांना बोलोरो पिक क्रमांक.MH.15.HH.1088 गाडी क्रमांकाची गाडी भरधाव वेगाने मुक्ताईनगर कडे पुरनाड फाट्यावरून जात असतांना गाडी चालकाच्या हालचाली वरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची शंका आल्याने पुरनाड फाट्याजवळ गाडी थांबवली असता सदर गाडी चालक याची विचारपूस केली असता एवढ्या भरधाव वेगाने गाडी का चालवत आहे असे विचारले असता आधी त्याने उडवाउडविचे उत्तर दिली परंतु जागरूक पत्रकारांनी पोलिसांना आम्ही याबाबत माहिती देतो आणि पोलिसांना इकडे बोलवतो असे सांगितले असता गाडी मध्ये अवैध गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली तसेच तात्काळ दुरध्वनीद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राजकुमार शिंदे साहेब यांना संपर्क करून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली आहे तरी आपण आपल्या पोलिस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावे व गाडी ताब्यात घ्यावी असे सांगण्यात आले त्या अनुषंगाने काही मिनिटांतच दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर गाडी पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आली व चालक चेतन बारी रा.जळगांव यांना पत्रकारांनीच विचारपूस केली असता मुळ मालक जळगाव चे असल्याचे सांगितले , शेवटची वृत्त हाती आले त्यावेळी सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुक्ताईनगर पोलिस स्टेशन मध्ये सुरू होती.




