बुलढाणामहाराष्ट्रवारकरी संप्रदायविदर्भ

श्रींच्या पालखी निमित्ताने शेगाव रोडवरील वाहतुक मार्गात बदल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी:- सागर रावणचोरे

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचा
१८ ऑगस्ट २६ रोजी शहरात मुक्काम राहणार असुन उद्या १९ ऑगस्ट २६ रोजी पहाटे पालखीचे शेगाव कडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोबत पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या पाहता शेगाव रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. १९ ऑगस्ट २६ रोजी पहाटे ४ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे १२ तास वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. ही वाहतुक खामगाव बसस्थानक ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगाव तसेच खामगाव बसस्थानक ते जलंब नाका व जलंब मार्गे शेगाव कडे वळविण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये उचित कार्यवाही करण्यात येईल, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी सुरेश कव्हळे यांनी एका आदेशाने कळविले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button