बुलढाणामहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील न.प. प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद सदस्य मा. अलकाताई धनावत यांच्या शुभहस्ते दिमाखात ध्वजारोहण करून झाली. यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भव्य व उत्साहपूर्ण प्रभात फेरी काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला, ज्यामुळे नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा नवा उत्साह दिसून आला.

प्रभात फेरीनंतर विद्यार्थ्यांची संगीत कवायत घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक कवायतीचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

गुणवंतांचे कौतुक व बक्षीस वितर

णयाच कार्यक्रमाचे औचित्य साधून ओलंपियाड आणि मंथन स्पर्धा परीक्षेत पदक (मेडल) मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती, उपस्थित पत्रकार व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन विशेष गौरव करण्यात आला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या मेघा भालेराव, उपाध्यक्ष रामदास गुरव, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देऊळगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जगताप यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button