खिरोडा मनसगाव रस्त्यावर ऑटो पलटी होऊन एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी*

*खिरोडा मनसगाव रस्त्यावर ऑटो पलटी होऊन एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी*
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे ) शेगाव तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या मनसगाव येथील अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी पोलिसांच्या सांगण्यानुसार ७ मार्च रोजी ४ वाजेच्या दरम्यान शेतातून आपल्या घरी येत असताना,भरगाव वेगाने असलेले मनसगाव येथील ऑटो क्रमांक एम एच २८ टी २३७७ चार प्रवासी घेऊन घराकडे परत असताना,चालक अनंता कोठे यांचे वाहनावरून नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाले. त्यातील चौघेही जणांना उपचारासाठी शेगाव येथील शासकीय सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते.परंतु डॉक्टरांनी त्यातील लक्ष्मण नारायण खेट्टे यांना मृत घोषित केले.तर प्रफुल्ल शेळके,अमोल रोहनकार हे दोन्ही जण किरकोळ जखमी झाले.तर चालक अनंता कोठे यांची प्रकृती गंभीर सांगण्यात येत असून,चालक अनंता कोठे यांना उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले. पुढील घटनेचा तपास शेगाव ग्रामीण जे ठाणेदार वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमदार धनराज माने हे करीत आहे.



