वंचित बहुजन आघाडीवंचित बहुजन युवा

प्रति, *
मा.तालुकाध्यक्ष/शहराध्यक्ष*
वंचित बहुजन आघाडीवंचित बहुजन युवा आघाडीवंचित बहुजन महिला आघाडीजिल्हा जळगाव पूर्व
आपणास कळविण्यात येते की,नुकतीच देशाच्या इतिहासाला कलंकित करणारी घटना मणिपूर येथे घडलेली असून त्या घटनेच्या निषेधार्थ *वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये* जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व विविध आदिवासी संघटनांच्या वतीने *विराट उलगुलान महामोर्चाचे* आयोजन करावयाचे असून,या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी *नियोजन बैठक भुसावळ येथे दिनांक ५ आॅगस्ट 2023 शनिवार रोजी* आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडी,जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे सर्व आजी-माजी सन्माननीय जिल्हा पदाधिकारी, युवा आघाडी,महिला आघाडी, सर्व सन्माननीय तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏*बैठकीचे ठिकाण/वेळ- शहिद अब्दुल हमिद सभागृह, पंचशील नगर ,भुसावळ दुपारी १२ वाजता.**शामिभा पाटील*समन्वयक – उलगुलान मोर्चाराज्य कार्यकारणी सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी *विनोद सोनवणे*जिल्हाध्यक्षवंचित बहुजन आघाडी*दिनेश इखारे*महासचिववंचित बहुजन आघाडी**बाळा पवार*जिल्हा समन्वयक-उलगुलान महामोर्चा



