आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश , पोकरा योजनेत मतदार संघातील या गावांचा समावेश !


आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश , पोकरा योजनेत मतदार संघातील या गावांचा समावेश !
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
दीपक माळी
आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ,
पोकरा योजनेत मतदार संघातील या गावांचा समावेश !
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पोकरा योजनेत मुक्ताईनगर मतदार संघातील उर्वरित गावांचा समावेश करण्याबाबत आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा केल्याने सुमारे २४ गावाचा समावेश झाला असून गेल्या अनेक वर्षापासून योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.
मुक्ताईनगर मतदार संघातील अनेक गावे आदिवासी व मागासवगीय बहुल गावे असल्याने तसेच बोदवड तालुका 100% अवर्षणप्रवण ग्रस्त असल्याने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावण्यासाठी व या भागातील शेती क्षेत्र आधुनिकतेकडे नेण्यासाठी मुक्ताईनगर व बोदवड व रावेर तालुक्यातील खालील नमूद उर्वरित गावांचा समावेश, महाराष्ट्र शासन , कृषी पशू संवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग ,शासन निर्णय क्रमांक : नादेकृ ४६२२/प्र.क्र.९४/८-अ मुंबई दि.१४ ऑक्टोंबर २०२४ अन्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत पोकरा योजनेत समावेश झालेला आहे.
रावेर तालुका
कोचुर खु. , बोरखेडे सिम , कोचुर बु.
बोदवड तालुका
नाडगाव, नांदगाव , पळासखेडे खु., वरखेड खु. , एनगाव, वरखेडे खु. , राजूर , शेवगे बु. चिखली बु. , मनुर बु. , मनुर खु.
मुक्ताईनगर तालुका
चारठाणे, मधापूरी , मोरझीरा, दौलतपुर, राजूरे, बोरखेडा, धामणगाव, बोदवड, पिंप्री आकराऊत, सातोड, निमखेडी खु. , माळेगाव



