बोडखा येथे वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रवचन मालिका बुद्धमय वातावरणात संपन्न..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.१२/९/२०२६.
भारतीय बौद्ध महासभा शाखा बोडखा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. पठाण आणि मनण चालू आहे. त्यानिमित्ताने ग्रंथाला भेट म्हणून नाशिक जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्ष केंद्रीय शिक्षक समता सैनिक दलाच्या आयुष्य माननीय सुरेखाताई बर्वे. जिल्हा संस्कार सचिव बौद्धाचार्य मिलिंद भाऊ वानखडे. पदस्पर्श अध्यक्ष कैलास भाऊ दाभाडे. अंबादास दाभाडे संघमित्र संघ पाचुर्डा तसेच सुजाता महिला संघ यांनी बोडखा येथील धम्मग्रंथाला भेट दिली असता सर्वप्रथम महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प. धूप. दीप प्रज्वलित करून त्रिशरण आणि पंचशील घेण्यात आले.
ग्रंथवाचक किसन भाऊ उमाळे यांनी ग्रंथ वाचन करून सर्वांना बुद्धाचा धम्म समजून सांगितला.
त्याचप्रमाणे गावांमध्ये भेट देण्याकरिता आलेल्या सुरेखाताई बर्वे यांनी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुले. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन आणि प्रवचन केले असता जमलेल्या सर्व लोकांची मन भारावून गेले.
विचारवंताना कोटी कोटी प्रणाम
तशेच आलेल्या सर्व पाहुणेमंडळीचा विशाखा महिला मंडळ आणि भीम क्रांती युवा मंडळाने पुष्प उधळून स्वागत करण्यात आले.
सरणतय गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोपण करण्यात आला.



