बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अग्निशमन सुविधा पूर्ण केल्याशिवाय व्यापारी संकुलाचा लिलाव नको

छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल प्रकरणी सचिन थाटे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; प्रस्तावित लिलावाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा प्रतिनिधी :-

संतोष गिऱ्हे

तेल्हारा, दि. ९ सप्टेंबर २०२६
नगर परिषद तेल्हारा अंतर्गत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलातील दुकानांचा लिलाव/भाडेपट्टा/ताबा देण्याची कार्यवाही करण्यापूर्वी आवश्यक अग्निशमन सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात यावी*, अशी मागणी सचिन गजानन थाटे यांनी दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

व्यापारी संकुलामध्ये नागरिक, व्यापारी व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का? त्यांची प्रत्यक्ष तपासणी व मान्यता घेण्यात आली आहे का? याबाबत निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

थाटे यांनी आपल्या निवेदनात, आवश्यक अग्निशमन सुविधा पूर्णपणे बसविल्याशिवाय दुकानांचा लिलाव, भाडेपट्टा अथवा ताबा देण्याची कोणतीही कार्यवाही करू नये अशी स्पष्ट मागणी केली आहे. तसेच प्रस्तावित लिलावाची प्रक्रिया सुरू असल्यास ती तात्काळ स्थगित करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

सुरक्षेचा प्रश्न गंभीर; आधी अग्निशमन व्यवस्था, नंतर लिलाव!

व्यापारी संकुलामध्ये भविष्यात आग लागण्यासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग व इतर सुरक्षा उपाययोजना सक्षम असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्था पूर्ण न करता दुकानांचा ताबा दिल्यास भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची ? असा सवालही या निवेदनामुळे उपस्थित झाला आहे.

नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेणार?

सचिन गजानन थाटे यांच्या निवेदनामुळे आता नगर परिषद प्रशासनासमोर व्यापारी संकुलाच्या अग्निशमन सुरक्षेची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. प्रस्तावित लिलावाची कार्यवाही स्थगित करून प्रथम अग्निशमन व सुरक्षा सुविधांची पूर्तता केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी तडजोड नको; अग्निशमन सुविधा पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button