अपघातखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

खाटूश्याम दर्शनहून परतताना काळाचा घाला : पिकअपला कंटेनरची धडक, ११ जणांचा दुर्देवी मृत्यू !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

देशभरातून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतांना आता राजस्थानमधील दौसा येथे पिकअप आणि कंटेनरच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ मुले आणि ४ महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील कासगंज (एटा) येथील रहिवासी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ३.३० वाजता सैंथल पोलीस स्टेशन परिसरातील बापी गावात हा अपघात झाला. पिकअपमधील सर्व लोक खाटूश्याम यांना भेटून परतत होते. सुरुवातीच्या तपासात कंटेनरने मागून पिकअपला धडक दिल्याचे समोर आले आहे. पिकअपमध्ये २२ हून अधिक भाविक होते. त्यापैकी १० जणांचा दौसा येथे मृत्यू झाला. दरम्यान, जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.या मृतांमध्ये पूर्वी (३), प्रियांका (२५), दक्षा (१२), शीला (३५), सीमा (२५), अंशु (२६) आणि सौरभ (३५) यांचा समावेश आहे. मृतांपैकी चार जणांची ओळख पटलेली नाही. काही जखमींना दौसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना जयपूर येथील सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसएमएसमध्ये दाखल करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्य (५), नैतीक (६), रीता (३०), नीलेश कुमारी (२२), प्रियंका (१९), सौरभ (२८), मनोज (२८) आणि आणखी एक जण आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button