बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी चा तडाखा. गारपिटीने पिके उध्वस्त. शेतकरी संकटात,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
:- प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
बुलढाणा – जिल्ह्यात अचानक झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने करायचे मोठे नुकसान झाले असून , आता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने , व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे.
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. ऐन हंगामात आलेल्या या पावसामुळे , गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोणार तालुक्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने अनेक गावांना अक्षरशा : झोडपून काढले. काही ठिकाणी गारपीटही झाली असून परिसरात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले,
अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. एकीकडे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असून. तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कांदा, गहू, हरबरा, चिया, तसेच इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



